पिढी बदलत आहे परंतु आपण?

एक पिढी संपली की दुसरी सुरू होते हा जीवनाचा क्रम आहे. साधारणपण पितृ ना स्मरण करून पुढे जाणे ही एक प्रथाच आहे.मागच्या पिढीला किंवा मागच्या पिढीने जे केलं ते थोड्या बहुत अंशी पुढे चालवणे,ह्याची मक्तेदारी कोणी ना कोणी तरी घेतच असतं.पण तरीसुद्धा नवीन पिढीच्या गतीला आणि त्यांच्या या सोशल मीडियामुळे एक मोठाच बदल येऊ घातला आहे.तेव्हा असं वाटतं की नवीन पिढी मागील आखून दिलेल्या रस्त्यांना सोडून स्वतःचेच नियम बनवत आहे.भारतामध्ये हा संक्रमण चा काळ आह,हे अनेक वेळी आपण अनुभवतो,वाचतो.

आता सीनियर सिटीजन कडे जाणारी पिढी वाढली ती वाढली होती कंजर्वेटिव्ह वातावरण मध्ये. पण त्यांनी आता वापरायचं आहे सतत बदलत जाणाऱ्या पिढी बरोबर म्हटलं तर अवघड आहे पण तरीसुद्धा या पिढीने स्वतःचे मूलभूत मूल्य जपले पाहिजे काही वेळेला वाटतं की या फास्ट लाईफ आणि मास मीडियाच्या वातावरण मध्ये ते काही तरी उलट सुलट होईल, काही गोष्टी समजणार नाही,पण हे मूल्य जपायचे आहेत व नवीन पिढीपर्यंत पोचवायचे आहेत. इथेच तर खरी कसोटी आहे. कारण जी मूल्य चिरंतन आहेत त्यांचे संदर्भ कदाच बदललेले असू शकतात. आणि म्हणूनच प्रत्येक वेळी आम्ही असं होतो असं करत होतो असं झालंच पाहिजे असंच केलं पाहिजे हे सगळे सोडून आत्ताच्या वर्तमान काळाला अड्जस्ट होणे फार गरजेचे आहे. कारण या सर्वांमध्ये आत्ताचे त्यांचे संदर्भ समजून घेण्याची जास्त गरज आहे मूल्य बदलत नसतात मूल्यांचे संदर्भ बदलतात आणि म्हणूनच आत्ताच्या पिढीला समजून घेणे हे फार गरजेचे नाही का!

Your Desired Mental Health is Just a Click Away!

कदाचित काही गोष्टी ही पिढी करू शकेल आणि करू शकली तर खूपच छान होईल काही गोष्टी सुचवाव्याशा वाटतात त्या म्हणजे ..

१) सर्व सदस्यांनी एकत्र एक वेळा तरी जेवावे आणि तेही कोणाचाही आवाज उंच न होऊ देता खेळीमेळीत
२) जेव्हा वेळ मिळेल तेव्हा निसर्गाकडे जाणे निसर्गाकडे आजच्या पिढीला घेऊन जाणे जसं की झाडांना पाणी घालणे, पक्षी बघणे,निसर्गाचा आवाज ओळखणे आणि ते ओळखायला शिकवणे
३)एकमेकांना दोष न देणे
४)एखाद्या जन्मदिनी स्वतःचा हस्तलिखित पत्र देणे
५) वृद्धाश्रम किंवा अनाथाश्रमला भेट देणे
६)कधीतरी संगीताच्या कार्यक्रमाला नेणे केव्हा चित्रांच्या प्प्रदर्शन ला घेऊन जाणे,पेटिंग बघायला जाणे.
अशे काही बीज रुजवूयात जेणेकरून एक सहिष्णू नवीन पिढी घडवू शकू.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top